Chetan Bodke
टेलिव्हिजनवरील इंडस्ट्रीचील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १५ वर्षांपासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करत आहे.
शोला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंदी मिळत असून शोमधल्या कलाकारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शोमधील सेलिब्रिटी एका शोसाठी किती मानधन घेतात? याबद्दल जाणून घेणार आहोत.
कायमच सोशल मीडियावर जेठालाल चर्चेत असतो. जेठालाल अर्थात दिलीप जोशी या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी दीड लाख ते दोन लाख रुपये इतके मानधन घेतो.
बापूजींचे पात्र साकारणारा अमित भट्ट या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ७० ते ८० हजार मानधन घेतात.
भिडे गुरुजी किंवा गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेचे पात्र साकारणारा मंदार चांदवडकर मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये इतके मानधन घेतो.
अय्यर पात्र साकारणारा तनुज महाशब्दे मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ६५ हजार रुपये इतके मानधन घेतो.
पत्रकार पोपटलालचे पात्र साकारणारा श्याम पाठक या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ६० हजार रुपये इतके मानधन घेतो.
बबिताचे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये इतके मानधन घेते.
अब्दुलचे पात्र साकारणारा शरद सांकला या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ३५ ते ४० हजार रुपये इतके मानधन घेतो.
माधवी भिडे हे पात्र साकारणारी सोनाली जोशी मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी ३५ हजार रुपये इतके मानधन घेते.
अंजली भाभीचे पात्र साकारणारी सुनैना या मालिकेमध्ये, एका एपिसोडसाठी २० ते ३० हजार रुपये इतके मानधन घेते.
संपूर्ण टप्पू सेना एका एपिसोडसाठी जेमतेम १० ते १५ हजार रुपयें इतके मानधन आकारते.