Chetan Bodke
अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस १७’मुळे चांगलीच चर्चेत आहे.
‘बिग बॉस १७’च्या पहिल्या दिवसापासून अंकिता आणि पती विकीमध्ये रोज सातत्याने वाद होताना पाहिले आहेत.
अंकिता आणि विकीतील भांडणानंतर अनेकदा सलमानने दोघांनाही त्यांच्या खेळावरुन खडेबोल सुनावले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये अंकिता आणि विकीची आई त्यांना भेटायला आले होते. तेव्हापासून त्यांच्यातील वाद काही प्रमाणात शमलेला दिसत आहे.
‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये अंकिताने एन्ट्री घेताच ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु होती. तिच्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.
अंकिता कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
अंकिता आणि विकीचे बिग बॉसच्या घरातील अनेक फोटोज सध्या सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. घरामध्ये कायमच त्यांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा होते.
अंकिता आणि विकीने १४ डिसेंबर २०२१ला लग्नगाठ बांधली होती.
अंकिता लोखंडेचा इंदौरमधील एका मराठी परिवारामध्ये १९ डिसेंबर १९८४ रोजी जन्म झाला.