Chetan Bodke
स्वयंपाकघरामध्ये आपण कायमच कढीपत्ताचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी वापर करतो.
हाच कढीपत्ता आपल्या जितकी जेवणाची चव वाढवते तितकाच आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर असतो.
कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील शुगर प्रमाणात राहते.
कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
कढीपत्त्यामध्ये व्हिटामीन सी, फॅट, प्रोटिन, आयर्नसह अनेक शरीराला लागणारे पोषक तत्वे असतात. त्यामुळे अनेक आजारांसाठी कढीपत्ता रामबाण उपाय आहे.
कढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात विटामिन ए,बी ,सी आणि आवश्यक तत्त्वे असतात. त्याचसोबत कॅल्शियम आणि आयर्न सारखी पोषक तत्वे असतात.
डायबिटीजच्या पेशंटला कडीपत्ता उपयुक्त असून त्याचे नियमित सेवन केल्यामुळे फायदेशीर ठरते.
कढीपत्त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते.
फायबरमुळे पोट भरल्यासारखे जाणवते, सोबतच जेवणामध्ये कढीपत्ता खाल्ल्यामुळे भूक कमी लागते आणि कॅलरी कमी होते.
ही वेबस्टोरी फक्त एका माहितीकरिता आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.