shambhuraj desai, uddhav thackeray, chandrashekhar bawankule
shambhuraj desai, uddhav thackeray, chandrashekhar bawankule  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : 'खोक्याचे सरकार.. बोक्याचे सरकार हे सगळं आज संपलं'; शंभूराज देसाई, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

Siddharth Latkar

- ओंकार कदम / कैलास चाैधरी

SC Final Decision on ShivSena : सर्वाेच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर (Supreme Court Final Decision on Shivsena Case) साता-याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी न्यायालयानं‌ दिलेल्या निर्णयाचं स्वागत केले. ते म्हणाले हा सत्याचा विजय आहे. आम्ही जनतेत जावुन काम करत आहोत. जनतेच्या सोबत आहोत हे यातुन अधोरेखीत झाल्याचं शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

देसाई म्हणाले उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि विरोधक सांगत होते आमचे आमदार आणि मुख्यमंत्री (cm eknath shinde) अपात्र होणार आणि सरकार ढासळणार, मात्र आम्हाला कोर्टाच्या निकालावर विश्वास होता.

संजय राऊत यांच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देत नाही असेही एका प्रश्नावर मंत्री देसाईंनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, यामुळं त्यांच सरकार गेलं हे न्यायालयाचे निरिक्षण आहे. आमचं सरकार कायदेशीर बहुमतातलं आहे. आमच्या सरकारला कोणताच धोका नाही असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याने...

धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule ) यांनी शिंदे फडणवीस सरकार हे कायदेशीर असून संविधानिक पद्धतीनेच सत्तेवर आले असल्याचं आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे असे म्हटलं. बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यामुळेच कायदेशीर पद्धतीने एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले.

या सरकारच्या विरोधात खोक्याचे सरकार बोक्याचे सरकार व बेकायदेशीर असल्याचा जो निरेटिव्ह सेट करण्यात येत होता, त्याला कोर्टाच्या या निर्णयाने चपराक बसली आहे असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

आता राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या मागणीला देखील उत्तर दिले असून आता राजीनामा देण्याचा काय संबंध, तुमचे संख्याबळ नाही हे लक्षात आल्यामुळेच तुम्ही (उद्धव ठाकरे) राजीनामा दिला. हे आता कोर्टाच्या निकालाहुन सिद्ध झाले आहे, त्यामुळे आता राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT