NEET परीक्षेतील 'त्या' प्रकरणावर राज्य महिला आयाेग आक्रमक; वैद्यकीय शिक्षण मंडळास दाेन दिवसांचा अल्टीमेटम (पाहा व्हिडिओ)

सांगलीतील प्रकाराचा राज्यभरातून निषेध नाेंदविला जात आहे.
Rupali Chakankar, Sangli, NEET Exam, NTA, maharashtra state commission for woman
Rupali Chakankar, Sangli, NEET Exam, NTA, maharashtra state commission for womansaam tv

- अक्षय बडवे

Sangli News : सांगलीत रविवारी झालेल्या नीट परीक्षेच्या (NEET 2023) काळात एका परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना त्यांचे कपडे आणि अंतर वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा द्यायला लावण्याचा प्रकार घडला. जागृत पालकांनी हा प्रकार समाेर आणल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. राज्य महिला आयाेगाने (maharashtra state commission for woman) याची गंभीर दखल घेत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना दाेन दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Breaking Marathi News)

Rupali Chakankar, Sangli, NEET Exam, NTA, maharashtra state commission for woman
Devendra Fadnavis News : शेतक-यांना दिलासा ! पीक कर्जासाठी Cibil Score मागणा-या बँकांवर गुन्हा दाखल हाेणार (पाहा व्हिडिओ)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) म्हणाल्या देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांनी समोर आणली आहे.

आपल्या राज्याबाबत बोलायचं झाल्यास सांगलीत विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत. ही परीक्षा संपूर्ण राज्यात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे असल्याचे चाकणकर यांनी नमूद केले.

Rupali Chakankar, Sangli, NEET Exam, NTA, maharashtra state commission for woman
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

चाकणकर पुढं म्हणाल्या परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com