shahupuri shivajinagar saam tv
महाराष्ट्र

Satara: शाहूपुरीत जलवाहिनी जाेडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; उद्या पाणी येणार

सातारा युवक कल्याण आणि क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे पाण्याचा अपव्यय टळला.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे शाहूपुरीच्या (shahupuri) काही भागाला आज (रविवार) पाणिपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान सातारा युवक कल्याण आणि क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली समय सुचकता व कार्यतत्परता यामुऴे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर घेण्यात आलं आहे. या भागातील (shahupuri) पाणी पूरवठा (water supply) उद्या (साेमवार) सुरळीत होईल असा दावा जीवन प्राधिकरण कार्यालयाने केला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून शाहूपूरी भागास पाणी पूरवठा केला जाताे. आज (रविवार) पहाटेच्या सुमारास शिवाजीनगर येथे जलवाहिनी फुटली. परिणामी या भागात पाणी पूरवठा हाेण्यास अडसर निर्माण झाला. या बराेबरच येथे माेठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागले. दरम्यान सातारा (satara) युवक कल्याण आणि क्रिडा मंडळाच्या काही कार्यकर्त्य‍ांनी तातडीने याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास कळविले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वतेज बालगुडे यांना देखील जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पाण्याची (water) अडचण भासणार याची माहिती प्राधिकरणास दिली.

त्यानंतर प्राधिकरणाने तातडीने जलवाहिनी जाेडण्यासाठी पथक पाठवले. यावेळी पथकाने पाणीपुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी तीन वाजेपर्यंत गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले हाेते. सातारा युवक कल्याण आणि क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे पाण्याचा अपव्यय टळला. उद्या (सोमवारी) शाहूपुरीचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे प्राधिकरणाच्या अधिका-यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Humanoid robot gives birth: जगातील पहिला ह्यूमनॉइड रोबोट बाळाला देणार जन्म? चीनमधील शास्त्रज्ञांचा दावा

Thane Fraud : शहापूरमध्ये मोफत शिबिरात आदिवासी महिलांकडून ३ हजारांची वसूली, डॉक्टर घटनास्थळावरून गायब

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

SCROLL FOR NEXT