Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : सरसकट कुणबी प्रणमपात्र देऊ नये; ओबीसींच्या न्यायासाठी बेमुदत उपोषण

Shahapur : बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करण्यात आली. त्याच पद्धतींने राज्य सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी

Rajesh Sonwane

फय्याज शेख 
शहापूर
: राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा (Shahapur) विचार सरकार करत आहे. परंतु हे प्रमाणपत्र न देणे, तसेच मराठा विरुद्ध ओबीसी यांचा सुरु असलेला संघर्ष थांबवावा आदी मगण्यांसाठी अखिल भारतीय ओबीसी (OBC) महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते यांनी वालशेत गावी आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली. (Tajya Batmya)

कुणबी आणि मराठा समाज अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. यापुढेही हे वातावरण टिकून रहावे, तसेच मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarkshan) देण्याबाबत आमचा अजिबात विरोध नाही. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मुळ कुणबी समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय नेतृत्वापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचे जाणवते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करण्यात आली. त्याच पद्धतींने राज्य सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, ओबीसींच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग हा २.६५ लाखाच्या जवळपास आहे. तरी तो त्वरित भरण्यात यावा, ओबीसी वर्गावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात ठोस पावले उचलावीत, शासकीय शाळा यांचे खाजगीकरण करण्याचे आदेश व मुंबई पोलीस भरती खाजगीकरणातून होणार या आदेशाला दिलेली स्थगिती उठवून दोन्ही जीआर तात्काळ रद्द करावेत; आदी उपोषणातील मागण्या असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री खासदार, आमदार व तहसीलदार यांना उपोषणकर्ते भरत निचिते यांनी पत्रव्यवहार केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिरूर हवेली विधानसभेत शरद पवारांची आघाडी

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT