Shahapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; शहापूर किन्हवली रस्ता बंद, ४० गावांचा संपर्क तुटला

Shahapur News : रात्रभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून नदीला मोठा पूर आला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : महाराष्ट्राच्या अनेक भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहापूर तालुक्यात देखील मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार पाहण्यास मिळत असून भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मिटरने उघडण्यात आले आहे. परिणामी सापगावात नदीचे पाणी शिरल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. तर शहापूर- किन्हवली रस्ता बंद झाला असून ४० गावांचा संपर्क तुटला आहे. 

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी जीवित व वित्त हानी झालेली आहे. अजून देखील पावसाने उघडीप दिलेली नसून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसानीची झळ सहन करावी लागत असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

शहापूर तालुक्यात रात्रभर पासून तुफान पाऊस पडत असल्याने पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. यामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने शहापूर सापगाव किन्हवली रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याने जोडले जाणाऱ्या ४० गावांचा संपर्क तुटला आहे. 

सुरक्षा रक्षक पथक गावात 

धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याने भातसा नदीचे पाणी सापगाव गावात शिरले आहे. यामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून गावात पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता असून महसूल विभागाचे तसेच जीवरक्षक टिमचे सदस्य या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. कोणतीही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणुन या ठिकाणी टिम सदस्य आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Side Effects: साबुदाणे खाल्याने नुकसान होतं का?

Filmfare Awards: ७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकन जाहीर; संपूर्ण यादी वाचा

Election Commission : आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; IAS, IPS सहित ४७० अधिकाऱ्यांची नियुक्ती

Asia Cup 2025 Final जिंकण्यासाठी 'त्याला' संधी द्याच, IND vs Pak सामन्याआधी दिग्गजाची मोठी मागणी

Nashik Rain: नाशिकमध्ये पावासाचा हाहाकार; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात कंटेनर वाहून गेला

SCROLL FOR NEXT