Dhadgaon News : घरात झोपलेल्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; धडगाव तालुक्यातील थरारक घटना

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश पाडे वस्ती या जंगल परिसरात आहे. अशात जंगलात शिकारीच्या शोधात फिरत असलेल्या वन्य प्राण्यांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत
Dhadgaon News
Dhadgaon NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच धडगाव तालुक्यातील घाटली गावात एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी जेवणानंतर खाटेवर झोपलेल्या एका महिलेवर वन्य प्राण्याने आत प्रवेश करत हल्ला केला. सुदैवाने कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आले असून, सध्या तिच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत.

नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या पर्वत रांगेत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाडे वस्ती या जंगल परिसरात आहे. अशात जंगलात शिकारीच्या शोधात फिरत असलेल्या वन्य प्राण्यांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. प्रामुख्याने बिबट्यांचे हल्ले सातत्याने घडत असून यात अनेकांचे जीव गेले आहेत. यातच एका वन्य प्राण्याकडून घरात घुसून हल्ला केल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली आहे. 

Dhadgaon News
Valuj Rain : वाळुज शहरात रात्रभर संततधार; तुर्काबाद खराडीत पाणीच पाणी, शेतातील पिके आडवी

हल्ला करून ओढत नेले शेतात 
सदर महिला सायंकाळी घराच्या ओसरीवर झोपलेली होती. याच वेळी कोबड्या खाण्याच्या उद्देशाने एक वन्यप्राणी घरात शिरला. याची चाहूल लागताच महिलेने जोरात ओरडून प्रतिकार केला. मात्र, प्राण्याने पलटवार करत महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या हातावर व कंबरेवर गंभीर चावा घेत जखमी केले आहे. तसेच तिला ओढत जवळील ज्वारीच्या शेतात घेऊन गेला.

Dhadgaon News
Rain Alert : रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

जखमी महिलेवर उपचार सुरु 

मेंद्री वसन पाडवी अशी जखमी महिलेची नाव आहे. दरम्यान घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी आरडाओरड करत त्वरित मागोवा घेतला. यानंतर प्राण्याच्या तावडीतून महिलेची सुटका केली. प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला तत्काळ खाजगी वाहनाद्वारे धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com