Valuj Rain : वाळुज शहरात रात्रभर संततधार; तुर्काबाद खराडीत पाणीच पाणी, शेतातील पिके आडवी

Sambhajinagar News : संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे येसगाव येथील कसार ओढ्यावरील पाझर तलावाचा सांडवा पाण्याबरोबर वाहून गेला आहे. त्यामुळे तुर्काबाद ते येसगाव रस्त्याचा संपर्क तुटण्याची शक्यता
Valuj Rain
Valuj RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून रात्रभर संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र दानादान उडाली असून गावागावात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहेत. त्यामुळे शेतीमालासह दुकानातील सामानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतातील पिके पावसामुळे आडवी झाली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान यात झाले आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर व आसपासच्या ग्रामीण भागात पावसाने कहर केला आहे. काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु झाली आहे. त्यामुळे उभी पिके आडवी झाली आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टी मुळे शेतातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालक, मेथी, कोथंबीर यासारख्या पालेभाज्या सडून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Valuj Rain
Extramarital Affairs : कंपनीची मालकीन विवाहित कर्मचाऱ्याच्या प्रेमात बुडाली, घटस्फोटसाठी ३ कोटी दिले, वर्षभरानंतर...

अनेक गावांचा संपर्क तुटला 
शनिवारी दुपारनंतर सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रभर सुरू होता. त्यामुळे वाळूज परिसरातील लवकी, नागझरी, कसार ओढा अशा अनेक ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिवना नदीवरील पूल, नागझरी नदीवरील पूल अशा ठीकठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वैजापूर लासुर, तुर्काबाद ते वाळूज, तुर्काबाद ते कासोडा, तुर्काबाद ते मलकापूर, शिरोली, डोमेगाव अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Valuj Rain
Beed Heavy Rain : पाच एकर शेती उध्वस्त; दोन्ही लेकरं गेली नातवांना कसे शिकवू, आजीचा आक्रोश

धरणाचा सांडवा गेला वाहून 

येसगाव, तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी या परिसरात रात्रभर संततधार पाऊस कोसळल्याने परिसरातील नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत आहे. या पावसाच्या पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे येसगाव येथील कसार ओढ्यावरील पाझर तलावाचा सांडवा पाण्याबरोबर वाहून गेला आहे. त्यामुळे तुर्काबाद ते येसगाव रस्त्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

रस्ते जलमय
वाळुज औद्योगिक वसाहतीतील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टरकडे जाणाऱ्या मोरे चौक ते वैष्णोदेवी मंदिराकडील रस्त्यावर पाणी वाहत असल्याने कामगारांना जीव धोक्यात घालून कामावर जावे लागत आहे. तसेच उद्योजकांच्या अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहेत. विशेष म्हणजे कामगार चौक येथील छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते दुभाजकावरून ओसंडून वाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com