Beed Heavy Rain : पाच एकर शेती उध्वस्त; दोन्ही लेकरं गेली नातवांना कसे शिकवू, आजीचा आक्रोश

Beed News : पावसामुळे सिंदफणा नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सिंदफणा नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. यात आतोनात नुकसान झाले आहे.
Beed Heavy Rain
Beed Heavy RainSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारात शिंदफना नदीपात्राने आक्राळ विक्राळ रूप घेतले आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने लेकराप्रमाणे जोपासलेली मोसंबीची बाग उध्वस्त झाली आहे. याच पुराच्या पाण्यात पाच एकर शेती उध्वस्त झाली असून आता नातवांना शिकवायचे कसं? असं म्हणत आजोबाईने हंबरडा फोडला आहे.  

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासापासून सलग धुवाधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे आता सिंदफणा नदीपात्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून आष्टी पाटोदा शिरूर बीड या भागांमध्ये झालेल्या पावसामुळे सिंदफणा नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सिंदफणा नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. यात आतोनात नुकसान झाले आहे. 

Beed Heavy Rain
Crime : ३ मुलींची इंस्टाग्राम Live वर हत्या, धक्कादायक घटनेनंतर जनसमुदाय भडकला, रस्त्यावर उतरले हजारो लोक

आजीच्या आसवांचा फुटला बांध 
बीड जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र बीडच्या गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारात वयोवृद्ध पार्वतीबाई अरगडे या माऊलीने हंबरडा फोडला असून माझी दोन्ही लेक गेले आहेत. आता नातवांचे शिक्षण कशावर करू. पाच एकर शेती पाण्याखाली गेली आहे. माझ्या भावना सरकारने समजून घेऊन मला मदत करावी; असा हंबरडा साम टीव्हीच्या कॅमेरासमोर फोडला आहे. 

Beed Heavy Rain
शिंदे गटातील आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ, रात्री ११ नंतर 'नो पेट्रोल', नेमकं कारण काय?

पूरग्रस्तांना मदतीचा हात 

बीडच्या श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीचा हात दिला असून नारायण गडावरील दसरा मेळाव्याला देणगी देण्याऐवजी ती देणगी पूरग्रस्त भागातील नागरिकांना देणगी द्या; असे आवाहन धाकटी पंढरी क्षेत्र संस्थान नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केले आहे. नागरिक अडचणीत आहेत. काही भागांमध्ये अन्नधान्य नाही, नारायणगडाला देणगी देण्यापेक्षा तुम्ही आता पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करा असे आवाहन महंत शिवाजी महाराज यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com