
Love Doesn't Work : कंपनीची मालकीन ऑफिसमधील एका विवाहित कर्मचाऱ्याच्या प्रेमात अखंड बुडाली. त्याच्यासोबत राहण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. घटस्फोटासाठी त्या कर्मचाऱ्याच्या बायकोला तीन कोटी ७२ लाख रूपये दिले. स्वत:ही घटस्फोटासाठी अर्ज केला. पण वर्षभरानंतर तिने आपला निर्णय बदलला अन् प्रियकर अन् तिच्या पत्नीला कोर्टात खेचलं. चीनमध्ये ही घटना घडली. झू नावाची कंपनीची मालकीन ऑफिसमधील कर्मचारी हे याच्या प्रेमात पडली. हे याला चेन याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी झू हिने ३ मिलियन युआन (३ कोटी ७२ लाख ७६ हजार) खात्यात ट्रान्सफर केले. इतकेच नाही तर झू हिने आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला.
प्रेमात अखंड बुडालेल्या झू हिने कोट्यवधी रूपये खर्च केले. स्वत:ही घटस्फोट घेतला. पण वर्षभरानंतरच झू हिने हे आणि त्याची पत्नी चेन यांना कोर्टात खेचलं अन् ३ कोटी रूपयांची मागणी केली. या घटनेबाबत दोन वेगवेगळ्या कोर्टात निर्णय येणार आहे. पण हे प्रकरण चीनमधील सोशल मीडियावर चर्चेचा विषय़ झाली. नेटकऱ्यांकडून यावर खमंग चर्चा केली जात आहे.
SCMP च्या रिपोर्ट्सनुसार, उद्योगपती झू ऑफिसमधील कर्मचाऱ्यासोबत वर्षभर राहिली. त्यानंतर तिला एक-दुसऱ्यासाठी परफेक्ट, योग्य नसल्याचा समजलं. त्यानंतर झू हिने हे याच्याकडे पैशांची मागणी केली. यावर चीनमधील चोंग्किंग कोर्टात ट्रायल झाले. कोर्टाने हे आणि घटस्फोटीत पत्नी चेन यांना पैसे माघारी देण्याचा निर्णय दिला. पण हुआशंग डेलीच्या रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या ट्रायलमध्ये निर्णय बदलला. चेन हिला दिलेले पैसे पोटगी अन् मुलाच्या खर्चासाठी देण्यात आले होते.
झू नावाची बिजनेसवुमन चीनमधील चोंग्किंगमध्ये एक कंपनी चालवते. ती ऑफिसमधीलच हे नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळी होती. दोघांचीही लग्न झालेली होती, पण ऑफिसमध्ये अफेअर सुरू झाले. एकत्र राहण्यासाठी दोघांनी आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतला. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी घटस्फोट घेतला. पण वर्षभरानंतर झू हिला चूक समजली, पण तोपर्यंत उशीर झाला. यावरून चीनमधील सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेकांनी झू हिच्यावर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.