Shahapur house suddenly caught fire a three and half year old boy died Saam Tv News
महाराष्ट्र

घराला अचानक आग, क्रिकेट खेळायला जाणाऱ्या मुलांची जीवाची बाजी; साडेतीन वर्षाच्या लेकराचा होरपळून मृत्यू

Shahapur House Fire : एक लहान मुलगा घरात अडकलेला एकाच्या लक्षात येताच त्याने लगेच घरात घुसून मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयायात पाठवले. मात्र रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाचे प्राणज्योत मालवली.

Prashant Patil

ठाणे : आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कसारा बायपासजवळ शहापूर येथे एका घराला लागलेल्या आगीत एक लहान मुलाचा मृत्यू झाला. त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्यासाठी पुढे धावले. मात्र, एक लहान मुलगा घरात अडकलेला एकाच्या लक्षात येताच त्याने लगेच घरात घुसून मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयायात पाठवले. मात्र रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाचे प्राणज्योत मालवली.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील कसारा बायपासजवळ वाशेळा गावाच्या रस्त्यालगत दत्ता बुले यांच्या घराला अचानक आग लागली. त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांच्या लक्षात येताच त्या मुलं घराला लागलेली आग विझवण्यासाठी थांबले. बाजूला पाणी टंचाई असल्याने साठवून ठेवलेल्या पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग विझवत असताना एका मुलाच्या लक्षात आले की आत एक लहान मुलगा आगीच्या विळख्यात अडकला आहे. क्षणाचाही विलंब न करता लगेच लहान मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. मात्र रूग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. कृष्णा बुले असं मृत मुलाचं नाव असून तो साडेतीन वर्षांचा होता. खासगी टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते पण संपूर्ण घर जळून खाक झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shanaya Kapoor: स्टायलिश लूकसाठी कपूर खानदानच्या लाडक्या लेकीला करा फॉलो

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

Pune Accident : पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT