SHAHAPUR-MURBAD ROAD MINI BUS ACCIDENT: DRIVER KILLED, THREE PASSENGERS SERIOUSLY INJURED Saam tv
महाराष्ट्र

Accident News : शहापूर-मुरबाड मार्गावर १६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

Shahapur Mini Bus Accident News : शहापूर-मुरबाड मार्गावर १६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.

Alisha Khedekar

  • शहापूर-मुरबाड मार्गावरील शेंद्रुण येथे मिनी बसचा भीषण अपघात

  • चालक प्रभाकर गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू

  • तीन प्रवासी गंभीर जखमी

  • बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते आणि ते अलिबागहून नाशिककडे परतत होते

फैय्याज शेख, शहापूर

शहापूर-मुरबाड मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास १६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधून एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून अलिबाग येथून नाशिककडे परतत होते. पहाटेच्या वेळी बस शहापूर-मुरबाड रस्त्यावरून जात असताना शेंद्रुण येथील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला खाली उतरली आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात बस चालक प्रभाकर गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात अश्विनी आकाश काळे (वय 27), पल्लवी वाल्मीक काठावटिक (वय 28) आणि कैलास हेमंत गायकवाड (वय 22) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर शेंद्रुण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली आहे. प्राथमिक तपासात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमधील संबंधित कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला; आता 'या' दिवशी देणार कोर्ट निकाल

Toxic relationship: प्रेमाच्या नावाखाली तुम्हीही टॉक्सिसिटीचा सामना करत नाहीये ना? जाणून घ्या संकेत

Shocking : प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावरून फेकलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव

नखांवर पांढरे डाग दिसले तर समजून जा तुमच्या शरीरात या व्हिटॅमिन्सची कमतरता

SCROLL FOR NEXT