Shahajibapu Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटील राजकारण सोडण्याच्या तयारीत, म्हणाले वरिष्ठ नेत्यांशी बोलून....

Maharashtra Politics: सोलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू यांनी थेट भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले.

Priya More

Summary -

  • शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाची छापेमारी

  • या कारवाईनंतर त्यांनी राजकारण सोडण्याचा विचार मनात आल्याचे सांगितले

  • दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यावर केले गंभीर आरोप

  • या घटनेमुळे सोलापुरमधील भाजप- शिवसेनेतील वाद समोर आला आहे

सोलापुरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. याठिकाणी शिवसेना-भाजपमधील वाद शिगेला पोहचताना दिसत आहे. शिवसेना शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. फक्त शहाजीबापूच नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या धाडसत्रावर आता शहाजीबापू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप केला. तसंच राजकारण सोडून देण्याचा विचार मनात येत असल्याचे सांगितले.

धाड पडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, 'हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. राजकारण सोडून देण्याचा विचार आज मनात येत आहे. वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी आता थांबण्याचा विचार करत आहे. अशा राजकारणाची पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही. सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळं पहावं. या धाडीमागे सांगोल्यामधील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत हे काम केले आहे.'

सांगोलामधील कार्यालयात पडलेल्या धाडीनंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मनात राजकारणातून बाजूला होण्याचा विचार आला आहे. त्यांनी ही बाब पत्रकार परिषदेत बोलून देखील दाखवली. त्यांनी भाजप नेत्यासह माजी आमदारावर केलेल्या गंभीर आरोपामुळे आता सोलापुरात भाजप-शिवसेनेतील वाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, पराभवाच्या भीतीमुळेच शहाजीबापू पाटील यांची स्टंटबाजी सुरू असल्याची प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभव समोर दिसू लागल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ते आरोप करत आहेत. केवळ मत मिळवण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निर्घृण हत्या अन् खांबाला बांधलं; तरूणासोबत मध्यरात्री नेमकं काय घडलं? कोल्हापूर हादरलं

Anti Aging Diet: टवटवीत, मऊ आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी कोणता आहार घ्यावा?

Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! तान्या मित्तलनं बिग बॉसमधील 'या' सदस्यावर केली काळी जादू? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Live News Update: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

Team India: विराट-रोहितला मिळणार 'फुल इज्जत', गंभीर-आगरकरचा BCCI घेणार क्लास, बोलवली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT