Amravati News अरुण जोशी
महाराष्ट्र

कंत्राटदाराने अडवून ठेवले सांडपाणी; दूषित पाण्यामुळे साथरोगाची लागण

दोन दिवसात 102 रुग्ण विविध आजाराचे आढळले असल्याने खळबळ उडाली आहे.

अरुण जोशी

अमरावती - कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाच्या पाणी पुरवठा विहिरी लागत पुलाच्या बांधकामाकरिता येथील कंत्राटदाराने सांडपाणी अडवून ठेवल्याने गावाला दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसात गावात दूषित पाण्यामुळे (Contaminated Water) उलट्यासह तापाने नागरिक फनफनू लागले आहेत. दोन दिवसात 102 रुग्ण विविध आजाराचे आढळले असल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

गेल्या वर्षाभऱ्यापासून रिद्धपुर ते तिवसा या मार्गाच्या रुंदीकरनांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू आहे. जवळपास या मार्गाचे काम हाता खाली आले आहे. मात्र सातरगाव ते तिवसा या तीन किलोमीटर मार्गाचे काम काही महिन्यापासून कासव गतीने सुरू असून याचा नाहक त्रास या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना होतो आहे.

या तीन किलोमीटर मार्गा वर तीन ते चार पुलाचे बांधकाम हे अर्धवट पडून आहे. परिणामी पुलाजवळ सांडपाणी थांबत असलेल्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत हे दूषित पाणी शिरत असल्याने नागरिक विविध आजाराला बळी पडत असून गावात साथरोगाची लागण पसरली आहे.

Edited By -Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT