Sambhajinagar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Crisis : संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; १८९ टँकरने पाणीपुरवठा

Sambhajinagar News : एप्रिल महिन्याच्या मध्यंतरात राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवू लागल्याने त्याठिकाणी ट्रॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. हीच परिस्थिती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झाली

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १५६ गावांमध्ये १८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्याचे काम सुरु आहे. 

मागील दोन महिन्यांपासून राज्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरवात झाली आहे. काही भागात तर मार्च महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर एप्रिल महिन्याच्या मध्यंतरात राज्यातील बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवू लागल्याने त्याठिकाणी ट्रॅकरची व्यवस्था करण्यात आली आहे. हीच परिस्थिती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झाली असून प्रामुख्याने ग्रामीण भागात अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 

विहिरींनाही पुरेसे पाणी नाही 

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा चटका वाढत चालला आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यातून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे नद्या, नाले आणि तलाव कोरडे पडले आहेत. तर बंधाऱ्यांमध्ये पाणी साठा नसल्याने अनेक गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. अनेक गावांतील विहिरींनाही पुरेसे पाणी नसल्यामुळे पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे. 

ट्रॅकरच्या ३४५ फेऱ्या 

सध्या जिल्ह्यातील १३८ गावे आणि १८ वाड्यांमध्ये १८९ टँकरद्वारे दररोज ३४५ खेपांतून पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२७ गावांतील १४४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये ६१ गावांमधील ७६ विहिरी टँकरसाठी वापरण्यात येत असून, उर्वरित ६६ गावांमधील ६८ विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT