Maharashtra Political Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील बड्या नेत्याचा भाजप आमदारावर गंभीर आरोप; सोलापुरात राजकीय संघर्ष पेटणार?

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या नेत्याने अपक्ष आमदाराचे टेंशन वाढवले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News: राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या नेत्याने अपक्ष आमदाराचे टेंशन वाढवले आहे. बार्शीचे अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतांवर शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी गंभीर आरोप केले आहे.

आ.राजेंद्र राऊत यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्र परिवाराची ७०० कोटी रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी आंधळकर यांनी केली आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात शिंदे गटाच्या भाऊसाहेब आंधळकरांनी जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र पोलीस दलातील माजी पोलीस (Police) अधिकारी यांनी पोलीस दलातून निवृत्त होताच शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण सुरू केले. बार्शी तालुक्यातील विद्यमान आमदारांचा विरोध करत मतांच राजकारण सुरू केलं. बार्शी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मर्जीतील अपक्ष आमदारांचे टेंशन वाढवण्याचा काम शिंदे गटाच्या नेत्याने सुरू केले आहे.

बार्शी मतदारसंघात २०१९ साली निवडून आलेले बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली आहे. ईडी,सीबीआय, आयकर विभागामार्फत ही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

१९९५ साली राजेंद्र राऊत यांकडे एक दुचाकी वाहन आणि सात एकर शेतजमीन होती.आज मात्र आ. राजेंद्र राऊत यांच्याकडे शेकडो एकर शेतजमीन आहे. कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. राजेंद्र राऊत हे स्वतः लोकसेवक असल्याने त्यांना अँटी करप्शन कायदा लागू आहे. त्या अनुषंगाने सीबीआय,अँटी करप्शन,इन्कम टॅक्स अशा विविध १७ शासकीय यंत्रणाकडे तक्रार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

SCROLL FOR NEXT