

नाट्यमय घडामोडी घडत असलेल्या विधाधन परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात मोठी उलथापालथ झाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुमारे चार हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी पिछाडी भरून काढत वंजारी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केलाय. महाविकास आघाडीला आता पाच निवडणूकांपैकी तीन ठिकाणी विजय मिळालाय. देशातील चार राज्यांतील विधान परिषदांच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला आतापर्यंतच्या मतमोजणीत एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे नागपूरची जागा जिंकल्यास काँग्रेसचं खातं उघडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.