Shivraj Patil Chakurkar Dies Saam Tv
महाराष्ट्र

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shivraj Patil Chakurkar Dies: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लातूर येथिल निवासस्थानी त्यांचे निधन झाले.

Priya More

Summary -

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

  • शिवराज पाटील चाकूरकर याचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन

  • लातूरमधील देवघर येथे आज सकाळी घेतला अखेरचा श्वास

  • दीर्घ आजारामुळे अनेक वर्षे घरीच उपचार सुरू होते

संदीप भोसले, लातूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. शिवराज पाटील हे लातूरमधील चाकूर येथील प्रभावी काँग्रेस नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून ७ वेळा विजय मिळवला होता.

शिवराज पााटील चाकूरकर हे २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. काँग्रेस आणि त्यांच्या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत शोकसंवेदना व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात, भाविकांच्या पीकअपला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Detox Drink : सकाळी उठल्यावर प्या हे हेल्दी कोथिंबीर लिंबूचे डिटॉक्स ड्रिंक

Maharashtra Live News Update: नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्याचा मुक्त संचार

Gold Price: सोन्याला चकाकी! १० तोळे सोनं १९,१०० रुपयांनी महागलं; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT