मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

Navjot Kaur Sidhu Controversial Statement : पंजाब काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर मोठी कारवाई केलीय. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षातून निलंबित केलं. पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी ही कारवाई केलीय.
Navjot Kaur Sidhu Controversial Statement
Navjot Kaur Sidhu during a press interaction after Punjab Congress announces her suspension over controversial remarks.Saam tv
Published On

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आलंय. पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी डॉ. सिद्धू यांच्या वादग्रस्त विधानांनंतर ही कारवाई केलीय.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्री पदावरून वादग्रस्त विधान केलं होतं. जो कोणी ५०० कोटी रुपयांचा 'सुटकेस' देतात, ते मुख्यमंत्री होतात. शनिवारी पत्रकारांशी बोलताना नवजोत कौर म्हणाल्या की जर काँग्रेसने त्यांना पंजाबमध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तर त्यांचे पती सक्रिय राजकारणात परत येतील. दरम्यान २०२७ मध्ये पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत.

Navjot Kaur Sidhu Controversial Statement
IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

यासह त्या म्हणाल्या की, त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाला देण्यासाठी पैसे नाहीत, परंतु ते पंजाबला "सुवर्ण राज्य" बनवू शकतात. "आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबितबद्दल बोलतो," राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

Navjot Kaur Sidhu Controversial Statement
IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

कोणी पैसे मागितले आहेत का या प्रश्नावर त्या म्हणाल्या की कोणीही ते मागितले नव्हते, परंतु जो ५०० कोटी रुपयांचा 'सूटकेस' देतो तो मुख्यमंत्री होतो. नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानावरून तेथील राजकारण तापलं . भाजप आणि आम आदमी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केलीय. हे काँग्रेसच्या कार्यपद्धतीचे "कुरूप सत्य" उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com