IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

DGCA Summons IndiGo : सलग आठ दिवसांपासून ऑपरेशनल समस्यांमुळे इंडिगोनं उड्डाणे रद्द केली आहेत. आता डीजीसीएने सीईओ आणि सीओओला चौकशीसाठी बोलवलंय.
DGCA Summons IndiGo
IndiGo aircraft at Indian airport as DGCA issues summons to airline’s top officials amid massive flight cancellations.saam tv
Published On
Summary

इंडिगोने माफी मागितली आहे .

कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी २४ तास दिले आहेत.

डीजीसीएने इंडिगोच्या सीईओ आणि सीओओ यांनाही नोटीस बजावली आहे.

उड्डाणाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे इंडिगो विमानसेवा सध्या फारच चर्चेत आहे. गेले आठ दिवस इंडिगोचा सावळागोंधळ सुरुय. इंडिगोचे संकट आज आठव्या दिवशीही सुरूय. ऑपरेशनल अडचणींमुळे ४५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलेत आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइनचे सीईओ आणि सीओओ यांना समन्स बजावले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता प्रतिनिधींना त्यांचे उत्तर द्यावे लागणार आहे. डीजीसीए आता इंडिगोचे अतिरिक्त मार्गक्रमणा कमी करणार आहे. डीजीसीएने चार सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय. ही समिती उद्या सकाळी ११ वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे.

गेल्या सहा दिवसांत रद्द झालेल्या सुमारे ३,९०० उड्डाणांबद्दल समिती या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची ही समिती क्रू प्लॅनिंग, ऑपरेशनल तयारी आणि नवीन फ्लाइट ड्युटी नियमांची तपासणी करत आहे. २ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या संकटामुळे हजारो प्रवाशांना त्रास झालाय. दरम्यान या वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितलीय.

DGCA Summons IndiGo
IndiGo Flight : इंडिगोकडून मोठा दिलासा! तब्बल ६१० कोटींची रिफंड प्रोसेस, देशभरात ९५% सेवा पुन्हा सुरू

तर १० डिसेंबरपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. डीजीसीएने इंडिगोच्या सीईओ आणि सीओओ यांनाही नोटीस बजावली आहे.रविवारी डीजीसीएने इंडिगोला कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी २४ तास दिलेत. यापुढे कोणताही वेळ दिला जाणार नाही. निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यास एकतर्फी कारवाई केली जाईल. असा इशारा डीजीसीएने दिलाय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले की ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि नियमांबद्दल कठोर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com