EVM Saam Tv
महाराष्ट्र

नाशकात निवडणुका तोंडावर असतांना ईव्हीएम मशीनची सुरक्षितता धोक्यात?

या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षा महत्वाची असल्यानं या यंत्रणेशी छेडछाड होऊ नये, यासाठी ही यंत्रणा ठेवलेल्या गोदामाच्या आतील सर्व रूम्समध्येही 24 तास सीसीटीव्ही कॅमेराची निगराणी ठेवण्यात येते.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - महापालिका निवडणुका (Election) काही महिन्यावर येऊन ठेपल्या असतानाच ईव्हीएम मशीन (EVM) असुरक्षित असल्याची घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या या यंत्रांच्या निगराणीसाठी करण्यात येणारे सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचं वेळोवेळी मागूनही सादर न केल्यानं संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या अंबड परिसरातील या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षा महत्वाची असल्यानं या यंत्रणेशी छेडछाड होऊ नये, यासाठी ही यंत्रणा ठेवलेल्या गोदामाच्या आतील सर्व रूम्समध्येही 24 तास सीसीटीव्ही कॅमेराची निगराणी ठेवण्यात येते. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिलेत. मात्र निर्देशानुसार सीसीटीव्ही रेकॉर्डिंग करण्यात आलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संशय निर्माण झाला आहे.

हे देखील पहा -

सीसीटीव्ही रेकॉर्डिंग बंधनकारक असूनही या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2019 ते 11 मार्च 2022 या कालावधीत सीसीटीव्ही रेकॉर्डिंग करण्यात आलेलं नाही, तर इथल्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची वारंवार मागणी करूनही ते जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलं नाही. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाकडून नायब तहसीलदारांच्या वतीनं रेकॉर्डिंगची जबाबदारी असणाऱ्या अलायन्स एंटरप्राईज कंपनीच्या मीना सारंगधर आणि अक्षय सारंगधर या दोघांविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल केला आहे.

केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या या ईव्हीएएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का करण्यात आलं नाही? या मशिन्ससोबत काही छेडछाड करण्यात आलीय का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून यामागचं सत्य आता पोलीस तपासातचं समोर येणार असलं, तरी निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील असणाऱ्या या यंत्रणेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT