mahayuti  Saam tv
महाराष्ट्र

Tribal Reservation : आदिवासी समाजासाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा गेमचेंजर निर्णय, ८ जिल्ह्यात सुधारित आरक्षण लागू

Tribal Reservation Update : आदिवासी समाजासाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. राज्य सरकारने आदिवासांसाठी गेमचेंजर निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आदिवासी बहुल ८ जिल्ह्यात सुधारित आरक्षण लागू होणार आहे.

Vishal Gangurde

सरकारचा आदिवसी समाजासाठी महत्वाचा निर्णय

आदिवासीबहुल ८ जिल्ह्यांमध्ये आरक्षण लागू होणार

सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाला १० टक्के आरक्षण मिळणार

Tribal Dominated Districts Reservation : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीने आदिवासाी समाजासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या समितीने आदिवासीबहुल ८ जिल्ह्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाला १० टक्के आरक्षण मिळणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये गट क आणि ड या संवर्गाताली पदांसाठी सुधारित आरक्षण आणि नवी बिंदूनामावली निश्चित करण्यात आली. याबाबतचा निर्णय सामन्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला.

राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्याचील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेण्यात आली. त्यानंतर संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात गट - क, गट - ड संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी आरक्षण विहित करण्यात आलं. त्याचबरोबर संदर्भ क्रं. २ येथील शासन निर्णयानुसार आदिवासी बहुल असणाऱ्या जिल्ह्यात गट - क, गट -ड संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी आरक्षणानुसार बिंदुनामवाली विहित करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीसाठी शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशास १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, नाशिक, नंदूरबार, पालघर, गडचिरोली, यवतमाळ, रायगड,चंद्रपूर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण विहित करण्याचा उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्याकरिता संदर्भ क्रं. ४ येथील निर्णयान्वये महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आळी होती. त्यानंतर सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

SCROLL FOR NEXT