School Closed 
महाराष्ट्र

School Closed : शाळा, कॉलेजना उद्याही सुट्टी, मुंबईसह ५ ठिकाणी निर्णय; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना

Maharashtra school holiday due to heavy rain : मुंबई, नाशिक, रत्नागिरी आणि पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे ७ जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

school holidays Tomorrow : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईला मंगळवारसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता उद्या, ७ जुलै रोजी शाळा महाविद्यालये आणि कार्यालयांना सुट्टी असेल का? याकडे लाखो विद्यार्थ्यांचे आणि चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे. बीएमसीकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयासाठी मंगळवारसाठी सुट्टी जाहीर केली आहे. महापौर रितू तावडेंनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. त्याशिवाय पुण्यातील प्रभावित भागातही पावसामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि रत्नागिरी शहरातील शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मुंबईत शाळांना सुट्टी, खासगी कंपन्यांना WFH

एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा आणि पाणी साचण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगारात मंगळवार आणखी तीव्र पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नवीन सूचना जारी केल्या आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) शाळा मंगळवार, ७ जुलै रोजी बंद राहतील. त्याशिवाय खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बीएमसीच्या सर्व शाळा आज आणि उद्या बंद आहेत; ही बंदी एक-दोन दिवसांसाठी वाढवली जाऊ शकते. आम्ही खासगी कंपन्यांनाही घरून काम करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. लोकल ट्रेन सेवा सुरू आहेत. संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. पावसामुळे लोकांनी ८ ते १० जुलैपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे. - रितू तावडे, मुंबई महापौर

रत्नागिरीत शाळांना सुट्टी -

हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला उद्या (मंगळवारी) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये अंगणवाड्या, शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व प्रकारच्या प्रशिक्षण संस्था उद्या बंद राहतील. हवामानाची बिघडती स्थिती पाहता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पुण्यातील या भागात शाळांना सुट्टी -

पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील म्हणजेच सह्याद्री घाट परिसरातील शाळा उद्याही बंद राहणार आहेत. मात्र, इतर तालुके आणि पुणे शहरातील शाळा मात्र उद्या सुरूच राहणार आहेत. पुणे शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली नाही.

नाशिकला ढग फुटीचा इशारा

नाशिकला ढगफुटी इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन नियोजनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात त्र्यंबक आणि इगतपुरी भागात शाळा आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पालघर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता. जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर, अध्यादेश काढत जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांचे आदेश. नागरिकांना सतर्कतेचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT