nagar news, tisgaon, morcha saam tv
महाराष्ट्र

Nagar News: महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा, कॉलेजची मुले-मुली उतरली रस्त्यावर, पाेलिस ठाण्यावर काढला माेर्चा

या घटनेबाबत आमदार राेहित पवार यांनी देखील व्यक्त केली चिंता.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : नगर जिल्ह्यातील तिसगाव बस स्थानकाच्या परिसरात उभे असलेल्या दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिसगाव परिसरात संतापाची लाट उसळली होती. (Maharashtra News)

याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने तिसगाव बंदचे (tisgaon bandh) आवाहन करण्यात आले होते. तसेच तिसगाव मधील शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर नेला. यावेळी आंदाेलकांनी समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

शहबाज पठाण असे छेड काढलेल्या संशयित तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. यापूर्वी त्याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनला छेडछाडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पठाण हा वारंवार असे प्रकार करत असल्याने एखादी मोठी घटना भविष्यात घडू शकते. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी तिसगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान या घटनेवर आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सरकारने विराेधी पक्ष फाेडण्यापेक्षा राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असं म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT