sayali kathmore, parbhani saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav च्या धामधूमीत नवऱ्यास भीती दाखवायला गेली अन् जीव गमावून बसली

राजेश काटकर

Parbhani News : जिंतूर तालुक्यातील कावी येथे एका नवविवाहितेने नवऱ्याला भीती दाखवन्याच्या उद्देशाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. दरम्यान बामणी पोलिसांनी दाेन्ही कुटुंबियांच्या माहितीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली. (Maharashtra News)

बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली (वय 19 वर्षे) हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने राहात होते. ते महालक्ष्मी सणासाठी गावाकडे आले होते.

21 सप्टेंबरला सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर सायलीला लक्ष्मण यांनी गणपतीकडे जातो असे म्हटले तेव्हा तुम्ही गणपतीकडे जाऊ नका मी फाशी घेईल असे सायलीने त्यांना सांगितले. लक्ष्मण यांनी हसत हसत घे फाशी असे म्हणात निघून गेले.

त्यानंतर सायलीने लक्ष्मण यास भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यात अडकविला, मात्र तिचा त्यातच प्राण गेला. हा प्रकार सायलीच्या मृत्यूनंतरच कुटुंबियांना समजला. तिची प्राणज्योत मावळल्याने काठमाेरे कुटुंबावर दुखाचा डाेंगर काेसळला.

दरम्यान या घटनेची माहिती पाेलीसांना देण्यात आली. घटनास्थळी बामणी पोलीस स्टेशनचे कृष्णा घायवट (सपोनी), जमादार सुभाष चव्हाण ,जमादार वसंत निळे यांनी पंचनामा करून मयत सायलीचे शविच्छेदन (22 सप्टेंबरला) जिंतूर येथील शासकीय दवाखाना येथे केले. सायलीच्या आई-वडिलांचे जबाब बामणी पोलिसांनी घेतले. त्यामध्ये त्यांनी आक्षेप न घेतल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT