Solapur,  saam tv
महाराष्ट्र

Sugar Factory : साखर कारखाना वाचविण्यासाठी हजाराे शेतक-यांनी शंभर ट्रॅक्टर, 50 बैलगाड्यांसह काढला माेर्चा

होम मैदानात माेर्चाचा समारोप हाेणार आहे.

विश्वभूषण लिमये

Shri Siddheshwar Sugar Factory News : सिद्धेश्वर कारखान्याच्या कोजनरेशनची चिमणी विमान उड्डानालां अडथळा ठरत असल्याचा अहवाल डीजीसीएने दिलेला होता. त्यानंतर ही चिमणी पाडून विमानसेवा सुरु करावी अशी भूमिका सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंचने घेतली. हरित लवादाने कारखान्याला क्लोजर नोटीस पाठवलीय. गाळप हंगामा सुरु असताना चिमणीचा वाद पुढे करून किंवा क्लोजर नोटीस पाठवून कारखाना बंद करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप कृती समितीने करुन आज हजाराे शेतक-यांच्या उपस्थित साेलापूरात विराट माेर्चा काढला. (Maharashtra News)

सोलापुरात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 'चिमणी बचाव' विराट मोर्चात सुमारे 25 ते 30 हजार शेतकऱ्यांचा सहभागी झाले आहेत. या मोर्चात 100 ट्रॅक्टर आणि 50 बैलगाड्यांचा समावेश आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून निघालेल्या मोर्च्याचा होम मैदानात समारोप हाेणार आहे.

होटगी रोड विमानतळचा 'उडान योजने'मध्ये सहभागी होऊन ही विमानसेवा सुरु झालेली नाहीये. होटगी रोड ऐवजी बोरामणी रोड वरील विमानतळ सुरु कराव यां मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. काँग्रेस आणि सोलापुरातील कांही संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनातून (aandolan) कारखाना (sugar factory) वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहाेत असे धर्मराज काडादी (संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'हा' अनोखा पक्षी कोणता? १० महिने सतत आकाशात उडतो आणि झोपतो, जाणून घ्या

Marathi Movie: 'मराठी शाळा पुन्हा भरणार…'; मराठी शाळाचं महत्व सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गणपती बाप्पा मोरया म्हणताना 'मोरया' या शब्दाचा नेमका अर्थ काय?

KDMC- कल्याण-डोंबिवलीत मनसेचा अनोखंं आंदोलन, खड्ड्यांविरोधात ढोल-ताशांचा गजर|VIDEO

Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा

SCROLL FOR NEXT