Satyajeet Tambe  Saam tv
महाराष्ट्र

Satyajeet Tambe News: सत्यजीत तांबे काँग्रेस सोडणार? ट्विटर बायोतून पक्षाचं नाव हटवलं, सोशल मीडियावर 'त्या' पोस्टची चर्चा

सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik News : सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने काल सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. सत्यजीत तांबे यांनी ट्विटर आणि फेसबुकवरील बायोतून पक्षाचं नाव हटवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे त्यांच्या पोस्टची चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहे. (Latest Marathi News)

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेस (Cognress) हायकमांडने सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील सत्यजीत तांबे यांच्यावरील कारवाईला दुजोरा दिला.

काँग्रेसच्या निलंबनाच्या कारवाईनंतर सत्यजीत तांबे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरील बायोतून पक्षाचं नाव हटवलं आहे. 'वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावच लागतं, असा आशयाचा संदेश कव्हरपेजवर सत्यजित तांबे यांनी लिहिला आहे.

'माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल'; सत्यजित तांबेंची पोस्ट चर्चेत

" जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल.." अशा आशयाच्या सत्यजित तांबे यांच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. तांबे यांचे समर्थक सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल करताहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करणारे सत्यजित तांबे कोणत्या राजकिय पक्षाच्या साथीने निवडणुकीला सामोरे जातात हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांच्या आवाहनाला समर्थक मात्र प्रतिसाद देताना दिसताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT