Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale: 'खोक्या'ला आज प्रयागराज कोर्टात केलं जाणार हजर, बीडमध्ये कसं आणणार? समोर आला पोलिसांचा प्लान

Satish Bhosale Arrested: सहा दिवसांपासून फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली. खोक्याला आज बीडमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बुधवारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. अखेर सहाव्या दिवशी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खोक्याला लवकरच बीडमध्ये आणण्यात येणार आहे. बीड पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. बीडमध्ये आल्यानंतर सतीश भोसलेला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज पोलिसांकडून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला. बीडवरून गेलेल्या पोलिसांच्या पथकाने खोक्या भोसलेचा ताबा घेतला. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिस ठाण्यातून त्याचा ताबा घेण्यात आला. खोक्याला ११ अकरा वाजता प्रयागराज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर आजच खोक्याला बीडमध्ये आणले जाणार आहे.

अटक केलेल्या खोक्याचा बुधवारचा मुक्काम प्रयागराज जेलमध्येच झाला होता. आज खोक्या भोसलेला प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची ट्रांझिट रिमांडची प्रक्रिया केली जाणार आहे. ट्रांझिटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीड पोलिस खोक्याला ताब्यात घेणार आहेत. यानंतर त्याला शिरूरच्या न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खोक्याला प्रयागराजमधून बीडमध्ये आणण्यासाठी मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरही त्याला आणले जाऊ शकते. आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला पोलिस बीड जिल्ह्यात घेऊन येतील असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरीरात 'हे' बदल दिसले तर दुर्लक्ष करू नका; असू शकतात गंभीर आजार

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत

Thursday Horoscope: स्वतःवर गर्व वाटेल अशा गोष्टी घडतील; या ५ राशींसाठी आजचा दिवस खास

Hair Care: ६ आठवड्यात थांबेल कायमचे केस गळणे, करा हा साधा घरगुती उपाय; केस होतील घनदाट आणि शायनी

SCROLL FOR NEXT