Satish Bhosale: खोक्याचे पाय आणखी खोलात, चौथा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Beed Crime Satish Bhosale: बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. खोक्याविरोधात बीडमध्ये चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आज त्याला प्रयागराजमधून बीडमध्ये आणण्यात येणार आहे.
Satish Bhosale: खोक्याचे पाय आणखी खोलात, चौथा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Beed Crime Satish BhosaleSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. खोक्याला बुधवारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली. आज त्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्यापूर्वीच त्याच्याविरोधात आणखी एक म्हणजे चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्यावर बीडमधील शिरूर पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. आता नव्याने वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याला राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता खोक्याचे पाय आणखी खोलात अडकले आहेत.

Satish Bhosale: खोक्याचे पाय आणखी खोलात, चौथा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Satish Bhosale: पुणे ते प्रयागराज व्हाया संभाजीनगर, ६ दिवस खोक्या कुठं- कुठं फिरला?

सिंदखेड राजा येथील वाघ आडनावाच्या व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत खोक्याविरोधात पहिला गुन्हा नोंदवला. त्यानंतर वन्यजीवांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीवरून ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केली याप्रकरणी खोक्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला. तर ८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वनविभाग आणि पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत गांजा सापडला. यावरून NDPS कायद्यांतर्गत कलम ३० नुसार त्याच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला.

Satish Bhosale: खोक्याचे पाय आणखी खोलात, चौथा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Satish Bhosale: मारहाण, पैशांचा माज आता गांजाचा बाजार; सतीश भोसले जबरदस्त फसले, खोक्याच्या जामिनात नवा अडथळा

बुधवारी रात्री वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत खोक्याविरोधात चौथा गुन्हा नोंदविला. त्याबरोबरच खोक्या राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला ७ दिवसांची मुदत देण्यात आली. सात दिवसांत मालकी हक्क सिद्ध न झाल्यास वनविभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे.

Satish Bhosale: खोक्याचे पाय आणखी खोलात, चौथा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Satish Bhosale : खोक्याचा बोक्या शोधा! पाप धुवायला गेला आणि अडकला, पोलिसांनी आवळल्या सतीश भोसलेच्या मुसक्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com