Satish Bhosale: मारहाण, पैशांचा माज आता गांजाचा बाजार; सतीश भोसले जबरदस्त फसले, खोक्याच्या जामिनात नवा अडथळा

Beed Crime Satish Khokya Bhosale: वन विभाग आणि पोलिसांनी केलेल्या झाडाझडीत खोक्याच्या घरात गांजा सापडला होता. पोलिसांना त्याच्या घरात ७ हजार २०० किंमतीचा ६०० ग्रॅम सुका गांजा मिळून आला.
Satish Bhosale: मारहाण, पैशांचा माज आता गांजाचा बाजार; सतीश भोसले जबरदस्त फसले, खोक्याच्या जामिनात नवा अडथळा
Published On

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून जामीनसाठी धावाधाव करणाऱ्या सतीश भोसले उर्फ 'खोक्याची' अडचण वाढलीय. शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणखी एका गुन्हा सतीश भोसलेविरोधात दाखल झालाय. मागील १५ ते २० दिवसात तीन गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झाली आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसलेविरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम २० नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वनविभाग व पोलिसांनी ८ मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी झाडाझडती घेतली होती, त्यावेळी गांजा सापडला होता. त्याचबरोबर सतीश भोसलेच्या घरातून प्राण्याचे वाळलेलं माससुद्धा जप्त करण्यात आले होते. त्याप्रकरणी वनविभाग पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय. बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सतीश भोसले फरार आहे.

पोलीस आणि वनविभाग त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी खोक्या वाल्मिक कराडप्रमाणे शरण जाणार असल्याची चर्चा आहे. शरण जाण्याआधी त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तिसरा गुन्हा दाखल

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी ८ मार्च रोजी वन विभाग आणि पोलिसांनी तपासणी केली होती.

Satish Bhosale: मारहाण, पैशांचा माज आता गांजाचा बाजार; सतीश भोसले जबरदस्त फसले, खोक्याच्या जामिनात नवा अडथळा
Beed Crime : सतीश भोसले महाराष्ट्राचा नवा विरप्पन, खोक्यानं शिकार केलेलं हरीण धसांच्या ताटात

झाडाझडतीवेळी पोलिसांना गांजा सापडला होता. या गांजाची किंमत काळ्या बाजारात ७ हजार २०० इतकी आहे. वनविभागाने ६०० ग्रॅम सुका गांजा जप्त केला होता. त्यासोबतच वनविभागाच्या गट क्रमांक ५१ मध्ये अतिक्रमित असलेल्या सतीश भोसलेच्या घरातून प्राण्याचे वाळलेलं मासदेखील जप्त करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Satish Bhosale: मारहाण, पैशांचा माज आता गांजाचा बाजार; सतीश भोसले जबरदस्त फसले, खोक्याच्या जामिनात नवा अडथळा
Beed News: आलिशान गाड्यांचा ताफा, कोट्यवधींची प्रॉपर्टी, खोक्या भोसले रस्त्यावर येणार; सतीशची संपत्ती जप्त होणार?

बीड पोलीस ॲक्शन मोडवर

खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. काल रात्री सतीश भोसलेची गाडी रायमोहा परिसरातून शिरुर कासार पोलिसांनी जप्त केलीय. सतीश भोसलेने हीच गाडी गुन्ह्यात वापरल्याची माहिती समोर आलीय. खोक्याने २०० हरणांची शिकार केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर सतीश भोसलेंने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सर्व आरोप खोडून काढली आहेत. जर २०० हरणांची शिकार केली असा आरोप माऊली शिरसाट करत आहेत, तर मग त्याने त्यावेळी तक्रार का दाखल केली नाही. २०० हरणं मारणं म्हणजे जोक नाही. तुम्ही त्याची शहानिशा करावी असं खोक्या म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com