bjp protest against nana patole saam tv
महाराष्ट्र

Nana Patole: 'त्या' वक्तव्याचा सातारा, सांगली, हिंगाेली, परभणी, पालघरात BJP कडून निषेध

राज्यभरातून नाना पटाेले यांच्या वक्तव्याचा भाजप समाचार घेऊ लागले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विजय पाटील, संदीप नांगरे, राजेश काटकर, रुपेश पाटील

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्ष राज्यभरात जाहीर निषेध करीत आहे. सातारा, सांगली, हिंगाेली, परभणी, पालघर आदी जिल्ह्यात काॅंग्रेस नेते नाना पटाेले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येत आहे. (bjp protests against nana patole statement on pm modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल परत एकदा नाना पाटोले यांनी अपमानास्पद आणि खालचा भाषेत वक्तव्य  केले आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करताे असे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी नमूद केले. गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर भाजपने नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारले.

हिंगोलीत आंदाेलन

हिंगोलीत (hingoli) भाजपने उग्र आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान नाना पटोले यांनी अपशब्द वापरून केवळ पंतप्रधान नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी केली आहे.

परभणीत आंदाेलन

काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा परभणीत छत्रपती शिवाजी महाराज परिसरात भाजप (bjp) कार्यकर्त्यानी निषेध करत आंदोलन केले. नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केलं. नाना पटोले परभणीत आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखवू असा धमकी वजा इशारा ही भाजप कार्यकर्त्यानी नाना पटोले यांना दिला. यावेळी आनंद भरोसे (भाजप शहराध्यक्ष) यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी झाले हाेते.

पालघरात आंदाेलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये (palghar) भाजपने आंदोलन करण्यात आले. प्रसार माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देणारा मोदी हा काँग्रेसचा बनावट असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आला. ठाकरे सरकार हाय हाय अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. नंदकुमार पाटील (जिल्हाध्यक्ष भाजपा पालघर) यांनी पटालेंविराेधात भाजप आक्रमक हाेणार असल्याचं नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT