निराशेतून मुख्यमंत्र्यांचा थयथयाट सुरु आहे - चंद्रकांत पाटील

एखादा माणूस फ्रस्ट्रेट झाला तर तो कसा वागतो ते उद्धव ठाकरेंच्या भाषणातून दिसत आहे. दसऱ्याला तेच, काल ही तेच, तीच तीच भाषणे आहेत.
chandrakant patil
chandrakant patilSaam Tv

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP)जोरदार टीका केली. यावर पाटील म्हणले की, एखादा माणूस फ्रस्ट्रेट झाला तर तो कसा वागतो ते उद्धव ठाकरेंच्या भाषणातून दिसत आहे. दसऱ्याला तेच, काल ही तेच, तीच तीच भाषणे आहेत. शिवसेनेला नगरपंचायतीत 43 ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाही, त्यामुळे निराशेतून मुख्यमंत्र्यांचा थयथयाट सुरु आहे. हिंदुत्व सोडलंय की नाही हे काँग्रेसला सांगा आम्हाला सांगायची काही गरज नाही असे देखील पाटील म्हणले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणले की, मुख्यमंत्र्यांच्या 2 वर्ष 3 महिन्यांच्या कालावधीत आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आतापर्यंत आमची भेट होऊ शकलेली नाही. आम्ही आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले इतकेच नाही तर अधिकृत निवेदनं दिली. नगरपंचायती एकट्याने लढवून ही भाजपला चांगले यश मिळाले.

हे देखील पहा -

सध्या नाना पटोले त्यांच्या मोदींवरील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणले की, नाना पटोले यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्यांची मानसिक आणि शारीरिक तपासणी करावी लागेल. अशा प्रकारची वक्तव्य करताहेत यामागचा हेतू नक्की काय? या वृत्तीचा आम्ही निषेध करतो, राजकारणाचा स्तर किती खाली घसरावा याचं उदाहरण नाना पटोले (Nana Patole) देत आहेत अशी खोचक टीका चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

chandrakant patil
अबब! माडग्याळमधील एका मेंढीची किंमत ऐकून थक्क व्हाल

पुढे रोहित पाटील विषय बोलताना चंद्रकांत पाटील म्हणले की, सगळे दिग्गज असताना जे यश मिळवलंय ते कौतुकास्पद आहे. आपल्या लोकशाहीची ब्युटी आहे की, धारावीच्या झोपडपट्टीतला एखादा म्हणू शकतो मला पंतप्रधान व्हायचंय, उद्या संजय राऊत ही म्हणतील मला पंतप्रधान व्हायचंय अशा सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा द्याव्या लागतील अशी खरमरीत टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com