Satara Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक, तरुणीच्या अंगावरून चाक गेले; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Satara Accident CCTV Video: साताऱ्यातील कराडमध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary:

  • कराडमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक

  • अपघातात दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या

  • एका तरुणीच्या पायावरून कारचे चाक गेले

  • अपघातामध्ये दोन्ही तरुणी गंभीर जखमी

  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली

संभाजी थोरात, सातारा

साताऱ्याच्या कराडमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणी रस्त्यावर पडल्या. यामधील एका तरुणीच्या पायावरून कारचे चाक गेले. या अपघातामध्ये दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरातील स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर हा अपघात झाला. कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या केल्या. दोन्ही वाहनं वेगात होती. अपघातामध्ये दोन्ही तरुणी खाली पडल्या. त्यामधील एका तरुणीच्या अंगावरून कारचे चाक गेले.

या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. स्थानिकांनी तात्काळ जखमी झालेल्या तरुणांनी कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही तरुणींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या अपघातामुळे कराड शहरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या वाहनांने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये अग्निशमन दलाच्या वाहनाच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत टँकर दुचाकीचा भीषण अपघात

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT