Akshay Kumar Car Accident: मुंबईत अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचा भयंकर अपघात; मर्सिडिजची ऑटोला जोरदार धडक | VIDEO

Akshay Kumar Car Accident Video Today: अभिनेता अक्षय कुमारच्या गाडीचा काल रात्री भीषण अपघात झाला. तो शुटिंग संपवून घरी जात असताना हा भीषण अपघात घडला.
Akshay Kumar Car Accident
Akshay Kumar Car AccidentSaam Tv
Published On
Summary

अभिनेता अक्षय कुमारच्या गाडीचा अपघात

रिक्षा येऊन अक्षयच्या गाडीला धडकली

सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही

अभिनेता अक्षय कुमारच्या कारचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री हा अपघात घडला आहे. अभिनेता अक्षय कुमार शुटिंग संपवून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. तो विमानतळावरुन जुहू येथील आपल्या घरी जात होता. तेव्हा एका मर्सिडीज गाडीने रिक्षाला धडक दिली. ही रिक्षा पुढे अक्षय कुमारच्या सिक्युरिटी व्हॅनला धडकली.

अक्षय कुमारच्या गाडीचा हा अपघात भीषण होता. यामध्ये रिक्षाचालकाला दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Akshay Kumar Car Accident
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसला 'या' सदस्याचं वागणं खटकलं; बाहेर जाण्यासाठी थेट दार उघडलं, पाहा VIDEO

अक्षय कुमारच्या गाडीला धडक

मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथे एक मर्सिडीज गाडी वेगाने येत होती. या गाडीने रिक्षाला धडक दिली. पुढे ती रिक्षा अक्षय कुमारच्या सिक्युरिटी व्हॅनला धडकली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. अक्षय कुमारदेखील सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ८.४५ ते ९ यामध्ये हा अपघात झाला. अक्षय कुमारसोबत पत्नी ट्विंकल खन्नादेखील होती. सुदैवाने अभिनेता आणि त्याची पत्नी दोघेही सुखरुप आहे. जुहू येथील गांधीग्राम रोड इस्कॉन मंदिर परिसरात हा अपघात घडला.

अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना होते सोबत (Akshay Kumar and Twinkle Khanna Car Accident In Juhu)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रिक्षा अक्षय कुमारच्या सिक्युरिटी ताफ्यातील एका इनोव्हा कारला धडकली. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे दुसऱ्या गाडीने पुढे गेले होते. त्यांच्या गाडीलादेखील थोडा धक्का बसला परंतु त्यांना दुखापत झालेली नाही. या अपघातात रिक्षाचालकाला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल केले.

Akshay Kumar Car Accident
Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून पाहणी

अक्षय कुमारच्या वाहनाच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे चाहते खूप चिंतेत होते. मात्र, आता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळता पोलिस घटनास्थळी पोहचले. विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी केली.

Akshay Kumar Car Accident
SRK Red Chillies Entertainment: शाहरुख खानच्या 'रेड चिलीज'ला हायकोर्टाकडून समन्स; ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com