MLA Mahesh Shinde criticises shashikant shinde Koregoan Nagar Panchayat Election Results 2022 saam tv
महाराष्ट्र

Satara Politics: 'शशिकांत शिंदे जमीन घोटाळ्यातील फरार आरोपी', महेश शिंदेंचा घणाघात; साताऱ्यात राजकारण तापलं; VIDEO

Maharashtra Politics Latest News: कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

ओंकार कदम

सातारा, ता. १६ सप्टेंबर २०२४

Mahesh Shinde Vs Shashikant Shinde: शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमीन घोटाळ्यातील फरार गुन्हेगार आहेत, त्यांनी पोलिसांना नैतिकता शिकवू नये असे म्हणत कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. साताऱ्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. महेश शिंदे यांच्या या टीकेमुळे साताऱ्यात विधानसभेआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काय म्हणालेत महेश शिंदे?

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय कुरघोड्यांसह टीका- टिपण्यांना जोर आला आहे. अशातच कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमीन घोटाळ्यातील फरार गुन्हेगार आहेत, त्यांनी पोलिसांना नैतिकता शिकवू नये, अशी टीका महेश शिंदे यांनी केली आहे.

शशिकांत शिंदे फरार आरोपी...

"शशिकांत शिंदे हे राज्य सरकारच्या जमिनींच्या अपहरातले मोठे, फरार गुन्हेगार असून त्यांनी पैशांचा अपहार केला आहे. या प्रकरणात त्यांना अजूनही या गुन्ह्यात जामिन मिळाला नाही त्यामुळे त्यांनी इतरांना नैतिकता शिकवू नये. त्यांनी आधी स्वत:च्या जामिनाचे बघावे आणि नंतर दुस-यांना नैतिकता शिकवावी," अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

CM शिंदेंचे कौतुक...

कोरेगाव मतदासंघाला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. या निर्णयांनंतर उपसा सिंचन योजनांमधील महत्वाची उपसा सिंचन योजना समजली जाते त्या तासगाव उपसा सिंचन योजनेला मुख्यमंत्री यांनी जीआर काढून मान्यता दिली. याच्या माध्यमातून वर्णे, देगाव , राजेवाडी, निगडी, कारंडवाडी, देवकरवाडी या गावांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला असून हजारो हेक्टर जमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. तसेच या गावांच्या सिंचनाच्या पाण्याच्या मिटल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT