Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...

Ajit Pawar On CM Eknath Shinde: मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा आहे. तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो, असे म्हणत अजित पवारांना डिवचले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही उत्तर दिले आहे.
Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...
Ajit Pawar On CM Eknath Shinde: Saamtv
Published On

सचिन गाड, मुंबई|ता. १६ सप्टेंबर

Ajit Pawar Ganpati Darshan Mumbai: लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून जनसन्मान यात्रेमधून स्वतः अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेमधील 'गुलाबी रंग' सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुनच एका औपचारिक गप्पांमध्ये बोलताना मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा , तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो, असे म्हणत अजित पवारांना डिवचले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही उत्तर दिले आहे.

Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...
Maharashtra Politics : विधानसभा २ टप्प्यात? एकनाथ शिंदेंनी सांगितली निवडणुकीची तारीख, महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं वक्तव्य

काय म्हणाले अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईमधील लालबागचा राजा तसेच सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुलाबी जॅकेटवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिले. 'पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र असलेला आहे, मुख्यमंत्री म्हणतात ते योग्य आहे. मी पण आज पांढरा शुभ्र शर्ट घातला, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मागली, तसेच गणेशोत्सव आहे कशाला उगाच हे हा बोलला तो ते बोलला सांगताय,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

"आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो होतो. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंगडे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. बापाकडे काय मागितलं नाही. राज्यात सुख समाधान शांती सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे. राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काय मदत राज्याकडून केंद्राकडून करायचे असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, या परिस्थितीतून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...
Panvel Crime News : अशी लेक नकोच! मुलीनेच १० लाखांत दिली आईच्या हत्येची सुपारी; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

शरद पवारांच्या टीकेला उत्तर...

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन बोलताना शरद पवार यांनी १५०० रुपये देण्यापेक्षा महिलांची अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असे म्हटले होते. यावरुन अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले. शंभर टक्के महिलांचे अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय त्याप्रमाणे आम्ही देखील करतोयलाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असे ते म्हणाले. तसेच बारामतीमध्ये एक गँगरेप झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र तपास केला असता त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही, अशाप्रकारे पोलीस खात्याची, लोकप्रतिनिधींची बदनामी होते, असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...
Donald Trump Shooting: मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; ४०० मीटर अंतरावरुन AK-47 रायफलने झाडल्या गोळ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com