mla mahesh shinde saam tv
महाराष्ट्र

Satara Politics: 'हातावर बांधलेली राखी विरोधकांच्या तोंडावर बांधा', आमदार महेश शिंदेंचे 'लाडक्या बहिणीं'ना आवाहन, म्हणाले...

MLA Mahesh Shinde On Ladki Bahin Yojana: 'आज माझ्या हातात बांधलेली राखी या लोकांच्या तोंडावर बांधा,' असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ओंकार कदम

Satara Politics News: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये आत्तापासूनच आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच 'आज माझ्या हातात बांधलेली राखी या लोकांच्या तोंडावर बांधा,' असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

कोरेगाव तालुक्यातील जळगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि आमदार महेश शिंदे यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. यावेळी जळगाव येथे पंचक्रोशीतील महिलांनी नामदार महेश शिंदे यांना राखी बांधून त्यांच्या औक्षण केले. या वेळी बोलत असताना नामदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली.

'लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यावरून विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवत आहेत. आता या योजनेचा तिसरा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे आता माझ्या हाताच्या राख्या बांधल्या आहेत त्या राख्या विरोधकांच्या तोंडावर आवळून बांधायची वेळ आली आहे म्हणजे ओरडणाऱ्या विरोधकांचे तोंड बंद होईल. आमच्या माता बहिणींचे आर्थिक स्थैर्य या लोकांना आता बघवत नाही," अशा शब्दात महेश शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

दरम्यान, कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची सत्ता आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, शशिंकात शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. २०१९च्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंना धुळ चारत जायंट किलरची भूमिका बजावली होती. त्यामुळे यंदा विधानसभेच्या निवडणुकीसही लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान शशिकांत शिंदेंसमोर असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT