Sanjay Raut: 'अमित शहांना स्वप्नदोष, भाजपने खुशाल स्वप्न पाहावी', संजय राऊतांचा खोचक टोला
Union Home Minister Amit Shah|Sanjay RautSaamtv

Sanjay Raut: 'अमित शहांनी खुशाल स्वप्न पाहावी, पण भाजपचे अध:पतन सुरू झालंंय', संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut On Amit Shah Mumbai Visit: भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावी. ते असंही म्हणू शकतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतही आमची सत्ता येत आहे, त्यांना कुणी अडवलं आहे? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Published on

मयुर राणे, मुंबई|ता. २ ऑक्टोंबर

Sanjay Raut On Amit Shah: महाराष्ट्राची निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा व दशा बदलेल, मी शब्द देतो महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. अमित शहांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावी, पण ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असा टोला राऊतांनी लगावला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"ही निवडणुक तुम्ही चोऱ्या लबाड्या करुन जिंकली. २०२४च्या निवडणुकीत तुम्ही २४० वर थांबला, पुढच्या निवडणुकीत १४० वर थांबाल. महाराष्ट्रासह हरियाणात तुमचा पराभव होत आहे. पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे. स्वप्न पाहण्यांवर ईडी, सीबीआय रेड टाकू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावी. ते असंही म्हणू शकतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतही आमची सत्ता येत आहे, त्यांना कुणी अडवलं आहे? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

"या देशातून भारतीय जनता पक्षाचे अधपतन सुरु झालं आहे. भारतीय जनता पक्ष जमिनीवरुन नष्ट झाला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, मतदार नाहीत. त्यांच्याकडे फक्त बाहेरुन चोरलेले गद्दार नेते आहेत. या गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही, हे शहांना लवकर कळलं, ते बरं झालं. अमित शहांनी भाजपची जी अवस्था आहे, त्याचं चित्र समोर आणलं. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, मतदार नाहीत. आम्ही फक्त पैशाच्या जिवावर सत्तेत आलो, हे केंद्रीय गृहमंत्र्याने कबुल केलं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut: 'अमित शहांना स्वप्नदोष, भाजपने खुशाल स्वप्न पाहावी', संजय राऊतांचा खोचक टोला
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत भाजपला व्होट जिहादचा फटका? देवेंद्र फडणवीसांचा वार; विरोधकांचा जोरदार पलटवार,VIDEO

"अमित शहा- नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट होतेय, आपण पाहतोय. महाराष्ट्र, मराठी खतम करायचा आहे. स्वाभिमानी कडा मोडून काढायंच आहे. महाराष्ट्राचा उरला-सुरला स्वाभिमान संपवून महाराष्ट्र गुजरातला जोडण्यासाठी त्यांना सत्तेत यायचं आहे. महाराष्ट्राचा हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहे," असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut: 'अमित शहांना स्वप्नदोष, भाजपने खुशाल स्वप्न पाहावी', संजय राऊतांचा खोचक टोला
Crime News : १ लाखाच्या मोबाइलसाठी डिलिव्हरी बॉयचा काटा काढला, घरात बोलवून संपवलं, त्यानंतर जे केलं ते वाचून डोक्याला हात लावाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com