Ganesh Visarjan Saam Tv (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

डॉल्बीवर पोलिसांचा दणका; डॉल्बी सिस्टीम मालकांवर १५ गुन्हे दाखल, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी चालकांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई. १५ गुन्हे दाखल करून सुमारे २.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी

Satara Police action against Dolby systems during Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी चालकांवर सातारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रस्त्यावर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात १२ आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात ३, असे एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत डॉल्बी साऊंड सिस्टीमसह ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पो असा सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

साताऱ्यात डीजे-डॉल्बीविरोधात ज्येष्ठ नागरिकांचा मूक मोर्चा

साताऱ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे-डॉल्बीचा दणदणाट सुरू असतानाच, याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले. डीजे आणि लेझर लाईटवर बंदीची मागणी करत ज्येष्ठ डॉक्टरांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान मूक मोर्चा काढत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. हातात निषेधाचे फलक धरून आणि मौन बाळगून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवला. त्याचबरोबर, सातारा पोलीस प्रशासनाने दिलेला शब्द पाळत ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजेवर योग्य ती कारवाई केल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदनही केले.

ज्येष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया :

"प्रत्येक सणावेळी हे ज्येष्ठ नागरिक कुठे गेलेले असतात? सकाळी पहाटे पाच वाजता भोंगा सुरू होतो, त्यावेळी या ज्येष्ठ नागरिकांना त्या आवाजाचा त्रास होत नाही का? मात्र हिंदूंचा गणपती उत्सव आला की ज्येष्ठ नागरिकांना डीजे-डॉल्बीचा त्रास होतो. आम्हीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत आहोत; जिथे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होते, तिथे १००% डीजे बंद करा, पण आम्ही गणपती कसा घेऊन जायचा?" असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया :

"आमच्या मंडळातील सुमारे ५०० महिला डीजेसमोर आनंद व्यक्त करत नाचत होत्या, त्यांना याचा काहीही त्रास झाला नाही. मात्र डीजे बंद केल्यामुळे या सर्व महिला नाराज होऊन निघून गेल्या. आमची कळकळीची विनंती आहे की, जर ९९% लोकांना डीजे लावून आनंद मिळत असेल आणि १% लोकांना त्रास होत असेल, तर आम्ही स्वखर्चाने त्या ज्येष्ठ नागरिकांना एका दिवसाच्या टूरसाठी बाहेरगावी पाठवतो," अशी प्रतिक्रिया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT