Mystery Deepens in Doctors Death at Phaltan Hotel Saam
महाराष्ट्र

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

Mystery Deepens in Doctors Death at Phaltan Hotel: साताऱ्यातील फलटणमधील नामांकित हॉटेलमध्ये डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं. या प्रकरणाबाबत हॉटेल मालकानं महत्वाची माहिती दिली.

Bhagyashree Kamble

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर सध्या अटकेत. पोलीस तपासात अनेक बाबी उलगडत आहे. अशातच डॉक्टर तरूणी मृत्यूपूर्वी ज्या हॉटेलमध्ये गेली होती, त्या हॉटेलचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. तसेच हॉटेल मालकानेही घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं? डॉक्टर तरूणीनं हॉटेलमध्ये गेल्यावर नेमकं काय केलं? याबाबतची माहिती दिली.

घटनेच्या दिवशी डॉक्टर तरूणी फलटण येथील नामांकित हॉटेलमध्ये गेली होती. रात्री १ वाजता हॉटेलमध्ये गेल्याची माहिती आहे. 'रात्री १ वाजता डॉक्टर तरूणी आली होती. बारामतीला निघायचं आहे. एवढ्या रात्रीचं प्रवास करणं योग्य नाही. त्यामुळे मला रूम पाहिजे, असं तिनं सांगितलं. माणुसकी म्हणून तिला रूम नंबर ११४ देण्यात आले. लॉजिंग आणि बोर्डिंगच्या ॲक्टप्रमाणे रजिस्टरला एन्ट्री करून आधार कार्ड नंबर घेऊन देण्यात आले, अशी माहिती हॉटेल मालकाने दिली'.

'दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते एकच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी बेल वाजवली. परंतु कुणीही दार उघडले नाही. पुन्हा तीन ते चारच्या दरम्यान बेल वाजवण्यात आली. कुणीही दार उघडत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. माझ्या ऑफिसची चावी मी लगेच पुण्यातून फलटणला पाठवून दिली. साधारण सहा वाजल्यानंतर ती रूम उघडण्यात आली', अशी माहिती हॉटेल मालकाने दिली.

'तेव्हा डॉक्टर तरूणीनं गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं निदर्शनाल आले. नंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेऊन, पुढची सर्व प्रक्रिया पार पाडली', अशीही माहिती हॉटेल मालकाने दिली. 'हॉटेलमध्ये आल्यानंतर स्टाफच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेचा चेहरा पडलेला दिसत होता. ती डॉक्टर तरूणी चिंतेत असल्याचं पाहायला मिळालं', असंही हॉटेल मालकानं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

जिमवरून आल्यानंतर काय आणि कधी खाल्लं पाहिजे?

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

SCROLL FOR NEXT