Satara doctor News  Saam tv
महाराष्ट्र

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

Satara Phaltan News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट समोर आला आहे. पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Vishal Gangurde

डॉक्टर मृत्यू प्रकरणात हस्ताक्षर जुळत नसल्याचा सुषमा अंधारे यांचा दावा

या प्रकरणात डॉक्टरची हत्या की आत्महत्या असा सवाल केला उपस्थित

नवी मुंबईच्या अश्विनी बिंद्रे प्रकरणाचं उदाहरण देत केले मोठे आरोप

अंधारे यांनी ५० कोटींच्या दाव्याची नोटीस मिळाल्याचेही सांगितले

ओमकार कदम, सातारा

मुंबई : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणात ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढत चालल्याचे दिसत आहे. पीडित डॉक्टर महिलेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नसल्याचा दावा ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यानंतर पीडितेची ही हत्या आहे की आत्महत्या आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबईच्या पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचं उदाहरण देत सातारा प्रकरणात मोठे आरोप केले आहेत. साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या हातावर पोलीस निरीक्षक लिहलेल्या शब्दात आणि पत्रात लिहिलेल्या शब्दात तफावत असल्याचा दावा अंधारे यांनी केला. दोन्ही हस्ताक्षराचे फोटो अंधारे यांनी दाखवले.

अंधारे यांनी दावा केला आहे की, 'पीडितेच्या हातावर 'निरीक्षक' असा शब्द लिहिण्यात आला आहे. त्यात पहिली वेलांटी देण्यात आली आहे. तर डॉक्टर महिलेच्या पत्रात त्याच शब्दाला दुसरी वेलांटी देण्यात आली आहे. तिने पत्रात एकूण ९ वेळा निरीक्षक शब्द लिहिला आहे'.

५० कोटींच्या नोटीशीवर अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'मला पुण्यात ५० कोटींच्या दाव्याची नोटीस आली आहे. मी काल महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले. कालच्या बोलण्यात एक गोष्ट सांगायची राहून गेली. एखाद्या प्रकरणात घटनेनंतर घटनास्थळाचा मुद्देमाल, लॅपटॉप आणि फोन जप्त केले जातात. या प्रकरणाची माहिती गोपनीय असते. कोर्टाच्या परवानगीनुसार कोर्टात सादर करायची असते. आम्ही या प्रकरणात सीडीआरची मागणी करतोय'.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अंधारे यांच्या मागणीनंतर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी कडकडीत मेगाब्लॉक! ट्रान्स हार्बरवर हालहाल होणार, कुठून कुठे अन् कसं असेल वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई,जन्म-मृत्यू नोंदीत छेडछाड करणार्‍यास बिहारमधून अटक

Gobi Paratha Recipe : 'असा' बनवा झणझणीत कोबीचा पराठा, लहान मुलं मिनिटांत टिफिन फस्त करतील

Solapur : सोलापूर पुन्हा हादरलं; राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या

Copper Side Effects: तांब्याची भांडी या ४ रुग्णांसाठी धोक्याची, जाणून घ्या महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT