Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

Satara doctor case : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Phaltan Doctor Case
Shocking Twist in Satara Phaltan Doctor CaseSaam
Published On
Summary

डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू आहे

आरोपी पीएसआय गोपाळ बदने याचा मोबाईल अजूनही पोलिसांना मिळालेला नाही

प्रशांत बनकरच्या पोलीस कोठडीच्या वाढीसाठी होणार मागणी

पोस्टमार्टम अहवालात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झालंय

हस्ताक्षर तपासाचा अहवाल सीआयडीकडून अद्याप समोर आलेला नाही

साताऱ्यातील डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाच्या तपासाचा वेग पोलिसांनी वाढवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. सातारा पोलिसांकडून आरोपी बनकरची आणखी काही दिवस पोलीस कोठडी मागत आहेत. दुसरीकडे बदनेने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केलेला नाही. त्याचा मोबाईल शोधणे आता पोलिसांचा मुख्य उद्देश आहे.

Phaltan Doctor Case
Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

दोन्ही आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना त्यात पोस्टमार्टमचा अहवाल देखील प्राप्त झालेला आहे. गळफास घेऊन आत्महत्या हेच अहवालातून समोर आलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.

Phaltan Doctor Case
Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

पोलिसांकडून आरोपी बनकरची वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षरचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. हॅन्ड रायटिंग एक्सपर्टचे सीआयडी त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आलाय. मात्र त्याला वेळ लागू शकतो. तपासात गोपाळ बदनेचा मोबाईल मिळवणे हा एक तपासाचा मुख्य उद्देश आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांना या प्रकरणातील तिघांचे सीडीआर रिपोर्ट हाती आले आहेत. आता पोलिसांकडून डिजिटल पुरावे गोळा करण्याचंही काम सुरु आहे.आरोपी गोपाळ बदने आणि डॉक्टरचं आत्महत्येआधी काय बोलणं झालं होतं, याचा तपशील मिळवण्यावर पोलिसांचा भर आहे. डॉक्टर महिलेचं आत्महत्येआधी पीएसआय बदनेशी बोलणं झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर आणखी नवा खुलासा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com