Udayanraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News: ...तर मिशीच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना पुन्हा चॅलेंज

Udayanraje Challenges Shivendraraje Bhosale : गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यात दोन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

ओंकार कदम

Satara News : गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यात दोन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. गेल्या ५ वर्षात सातारा नगरपालिकेचा कारभार उदयनराजे यांच्या गटाकडे होता. या कारभारावर बोट ठेवत आमदार शिवेंद्रराजे यांनी बऱ्याच वेळा उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, या आरोपांना उत्तर देताना उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना थेट चॅलेंजच दिले आहे.  (Breaking Marathi News)

तुम्ही दिवस वार आणि वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही कुठे भ्रष्टाचार केला हे दाखवा, एकाने जरी उदयनराजेंनी भ्रष्टाचार केला हे दाखवले तर मिशाच काय भुवया सुद्धा टाकेन, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आव्हान दिले.सातारा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी विविध विकासकामांचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

"ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत. तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली.", असं उदयनराजे म्हणाले.(Latest Marathi News)

"आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही", असं थेट चॅलेंज उदयनराजे यांनी दिलं.

"तुम्हाला जनमत अजमावयाचं आहे तर सातारा काय महाराष्ट्रात चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टिकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होतो. मला काय स्वत:चं पेटिंग काढण्याची हौस नाही. लोकं का पेटिंग काढतायत याचा कधी विचार केलाय का?" असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT