Satara News Saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale : मविआला फटका बसल्याने लाडकी बहीण योजना बदनाम; शिवेंद्रराजे भोसलेंची शशिकांत शिंदे यांच्या विधानावर प्रतिक्रिया

Satara News : महायुतीचे सरकार ज्यावेळी पंधराशे रुपये देत होते. त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या सरकारने तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केली होती. याचा अर्थ त्यांनी घोषणा केली म्हणजे तो दरोडा नव्हे का

ओंकार कदम

सातारा : लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेला योजनेला शशिकांत शिंदे बदनाम करत आहेत; अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या विधानावर प्रतिउत्तर देताना दिली आहे. 

विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत डिसेंबरमध्ये लावलेल्या निकषाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री भोसले म्हणाले, कि महायुतीचे सरकार ज्यावेळी पंधराशे रुपये देत होते. त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या सरकारने तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केली होती. याचा अर्थ त्यांनी घोषणा केली म्हणजे तो दरोडा नव्हे का? आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली म्हणजे हा दरोडा झाला. ही दुटप्पी भूमिका म्हणावी लागेल. या योजनेमुळे त्यांना फटका बसल्यामुळे या योजनेला बदनाम करायचं चाललं आहे. 

तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई 

मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेत जे बसत नाहीत; त्यांची तपासणी करून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी जाणीवपूर्वक नावे नोंदवून घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी हे नियोजन असल्याची प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. 

सातारा महानगरपालिका होण्याच्या दृष्टीने जनगणना
सातारा महानगरपालिका होण्याबाबत काही निकष आहेत. सध्या नगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. आता पुढील निवडणुकीच्या दृष्टीने देखील जनगणना होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जनगणना झाली, तर याला गती येऊ शकते. सातारा शहरात यापुढील काळात ई-बसेस धावतील. या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याची माहिती यावेळी शिवेंद्रराजे भोसले दिली आहे.

समृद्धी महामार्गावर खिळे टाकणाऱ्यावर कारवाई

समृद्धी महामार्गावर खिळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचा प्रकार सुरू आहे. ही गंभीर बाब असून याबाबत आमचा बांधकाम विभाग एमएसआरडिसी यांना सूचना केल्या जाणार आहेत. जे कोणी समाजकंटक हे कृत्य करत असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT