Pimpri Chinchwad Police : वर्षभरात ३३ घुसखोरांना घेतले ताब्यात; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

Pimpri chinchwad News : औद्योगिक नगरी, कामगार नगरी अशी पिंपरी चिंचवड शहराची ओळख त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काम मिळवण्यासाठी बांगलादेशी तसेच रोहिग्या नागरिक मोठ्या प्रमाणात करून राहण्याचा प्रयत्न करतात
Pimpri Chinchwad Police
Pimpri Chinchwad PoliceSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : राज्यातील अनेक भागात बांगलादेशी घुसखोरी करत वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसात अशा घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी २०२३-२४ या  एक वर्षाच्या कालावधीत एकूण ३३ घुसखोर नागरिकांवर कारवाई केली आहे. यात २९ बांगलादेशी आणि ४ रोहिंग्यांचा समावेश आहे.

औद्योगिक नगरी, कामगार नगरी अशी पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काम मिळवण्यासाठी बांगलादेशी तसेच रोहिग्या नागरिक मोठ्या प्रमाणात करून राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट सारखे बनावट कागदपत्र तयार करतात. अशा पद्धतीने काहीजण वर्षभरापासून तर काही जण सहा महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अन्य शहरांमध्ये देखील यांचे वास्तव्य वाढल्याचे पाहण्यास मिळाले आहे. 

Pimpri Chinchwad Police
Nandurbar Crime : शाळा, कॉलेजपासूनच काही अंतरावर खुलेआम देहविक्री; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

घुसखोरांवर वर्षभरात कारवाई 
दरम्यान काही नागरिक हे देश विघातक कारवायांमध्ये देखील सहभागी होत असल्याने पोलीस अशा बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या घुसखोरांविरोधात सतत मोहीम राबवत असते. त्या मोहिमेत आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलिसांनी २९ बांगलादेशी आणि ४ रोहिंग्यां घुसखोरांवर मागील वर्षभरात कारवाई केली आहे. अजून देखील तपस लागल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. 

Pimpri Chinchwad Police
Badlapur : निवृत्तीनंतर दाम्पत्याने माळरानात फुलवली फळबाग; शेततळ्यामुळे ६ एकर जमीन झाली हिरवीगार

६२ पारपत्र केले रद्द 

पिंपरी चिंचवड पोलिसांनी वर्षभरात केलेल्या कारवायांमध्ये ३३ जणांना ताब्यात घेतले होते. तसेच बनावट कागदपत्राच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले ६२ पारपत्र देखील पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी रद्द केले आहेत. पोलिसांची हि कारवाई अविरत पणे सुरु असल्याने वेगवेगळ्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशींना ताब्यात घेतले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com