Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara : सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण; नागेवाडी परिसरातील सहा हेक्टर जागेचा झाला ड्रोन सर्वे

Satara News : चार महिन्यांपूर्वी परिसरातील शासकीय जागेच्या संदर्भातील प्रस्ताव सादर करून सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या जमिनीच्या बाबत ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले

ओंकार कदम

सातारा : सातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्क उभारणीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. आयटी पार्कसाठी तब्बल ६ हेक्‍टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातारा मध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे आता सातारकर यांचे आयटी पार्क चे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. 

सातारा शहराच्या लिंब नागेवाडी परिसरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा उपलब्ध असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी परिसरातील शासकीय जागेच्या संदर्भातील प्रस्ताव सादर करून सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या जमिनीच्या बाबत ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

लवकरच अधिसूचना जाहीर 

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले याबाबत बोलताना म्हणाले कि साताऱ्यातील आयटी पार्क व्हावे, ही सर्व सातारकर यांची इच्छा आहे. या ड्रोन सर्वे नंतर या जागे संदर्भात अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठवा पुरावा करण्यात आला होता.  

कन्वेन्शन सेंटरचाही प्रस्ताव 

शहरालगत उभारण्यात येत असलेल्या आयटी पार्क बरोबरच येथे कन्वेंशन सेंटरचा प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे. या सेंटरचा उपयोग सातारकरांना विविध कार्यक्रमांसाठी होणार आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध होणार असल्याने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत पोलिसांवर स्थानिक गुंडांचा हल्ला,VIDEO

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

SCROLL FOR NEXT