Satara City saam tv
महाराष्ट्र

Woman Police : दारुच्या नशेत रिक्षाचालकाची मग्रुरी, महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, VIDEO

Satara City : सातारा शहरामध्ये एका रिक्षाचालकाने महिला कॉन्स्टेबलला रिक्षाच्या मागे फरफटत नेले. महिला कॉन्स्टेबलने चालकाला अडवले होते. त्यानंतर चालकाने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • सातारा वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ला रिक्षाने नेले फरफटत

  • सातारा शहरातील खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल दरम्यान घडली घटना

  • घटनेत महिला पोलीस जखमी, रिक्षा चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती

ओंकार कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Satara News : सातारा शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सातारा वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला एका रिक्षाने फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या महिला कॉन्स्टेबलने रिक्षाचालकाला अटकाव केला होता. त्यानंतर चालकाने असे कृत्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यामध्ये रिक्षा चालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेले. ही घटना सातारा शहरातील खंडोबाचा माळ ते मनाली हॉटेल दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे महिला पोलीस गंभीररित्या जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. रिक्षा चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाने ६ ते ७ दुचाकी आणि चारचाकींना धडक दिली होती. तो दारूच्या नशेत टल्ली होता. त्याला अटकाव करण्याचा या महिला कॉन्स्टेबलने प्रयत्न केला. तेव्हा रिक्षाचालकाने त्यांना फरफटत नेले. या घटनेत महिला कॉन्स्टेबंल रक्तबंबाळ झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबा माळपासून मार्केट यार्डपर्यंतचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रिक्षाच्या मागे महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेल्याने स्थानिक नागरिकांनी रिक्षा चालकाला चोप दिला. त्यानंतर सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna : साप पकडण्याचं धाडस थेट जीवावर बेतलं, ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू | VIDEO

Akshaye Khanna: तीच करारी नजर अन् तोच अंदाज, छावानंतर अक्षय खन्नाचा नवा चित्रपट, पोस्टरवरून चाहत्यांची नजर हटत नाही

Hair Care : पन्नाशीतही चमकदार-काळेभोर केस हवेत? आतापासूनच खा 'हे' ५ पदार्थ

Maval : पाच किलोमीटरची पायपीट थांबली; नवरात्र उत्सवात सावित्रीच्या लेकींचा सायकल देऊन सन्मान

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांना 50 लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT