Satara News Anewadi Toll Naka stopped the cars of the varkari dindi  Saam TV
महाराष्ट्र

Satara News: आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; CM शिंदेंचे आदेश धाब्यावर, नेमकं काय घडलं?

Satara Marathi News: साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावर अडवण्यात आलं.

साम टिव्ही ब्युरो

Satara Marathi News: साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावर अडवण्यात आलं. टोल भरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं म्हणत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश डावलून वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी नाकारली. यामुळे टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते. (Latest Marathi News)

सरकारचा आदेश असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिंडीतील वाहनांना टोलमाफी नाकारल्याने वारकऱ्यांनी भजन आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी पोलीस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वारकऱ्यांना टोलनाक्यावरील मार्ग मोकळा करून दिल्याने आंदोलन स्थगित करून वारकरी आळंदीकडे मार्गस्थ झाले.

आषाढी वारीसाठी पंढरपूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला नको, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चोख नियोजन करण्याचे आदेश दिले होते. वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, साताऱ्यातील टोलनाक्यावर मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर टाकल्याचं दिसून आलं.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक वारकरी आपल्या वाहनांसह आळंदी व देहू येथे प्रस्थान करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून आळंदीला पोहोचण्यासाठी हजारो वाहने पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावरून जात आहेत.

मात्र, आनेवाडी (Satara News) टोल नाक्यावर रिलायन्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न होत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आनेवाडी टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी वाहने अडविल्याने वारकरी आक्रमक झाले. त्यांनी टोल नाक्यावर बसून भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे टोलनाका वातावरण तणावग्रस्त झालं होते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने आनेवाडी टोल नाक्यावर दाखल झाले. रिलायन्सचे अधिकारी आणि वारकरी यांच्यात मध्यस्थी करून वारकऱ्यांच्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिल्याने वारकरी आळंदीकडे मार्गस्थ झाले. यावेळी आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाद मिटल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT